शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
कस्पटे वस्ती येथील मनपा शाळेत प्रवेशोत्सव नवागतांचे स्वागत पाठ्यपुस्तक वाटून शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्यात आली. यावेळी पहिल्यांदा प्रभातफेरी काढण्यात आली. त्यानंतर इयत्ता पहिलीच्या मुलांचे औक्षण करून त्यांना गुलाब पुष्प, चॉकलेट देण्यात आले. त्यानंतर पुस्तक वाटप करण्यात आले.
यावेळी मा. नगरसेविका ममता ताई गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते गणेश भाऊ कस्पटे, रामदास भाऊ कस्पटे, रामहरी तात्या कस्पटे तसेच संकेत चोंधे यांनी नवागतांचे स्वागत केले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका व त्यांचे सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
यावेळी सर्व शाळा सजवण्यात आली होती. शाळेत मुलांना ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत आणण्यात आले. सर्व शालेय परिसरात आनंद पसरला होता. सर्व मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. यावेळी पालकही उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक संगीता पाटील, फिस्के सर ,सौ सविता माने, बाळसराफ शशिकला, वैशाली माने ,विनोद पाटील, सुप्रिया अडसरे, राहुल जाधव, प्रवीण कस्पटे ,कडुसकर यांनी परिश्रम घेतले प्रास्ताविक व स्वागत सविता माने यांनी केले सूत्रसंचालन व आभार श्री फिस्के सर यांनी मानले.