शबनम न्युज | सांगवी
छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सांगवी च्या नूतन माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावी चा निकाल शंभर टक्के लागला एकूण 53 विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यामध्ये 47 विद्यार्थी डिस्टिंक्शन मध्ये पाच विद्यार्थी रेड एक मध्ये व एक विद्यार्थी ग्रेड दोन मध्ये आले आहे. शाळेची विद्यार्थिनी श्रुतिका आंबेकर हि 92 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम आली आहे. त्याचबरोबर दीक्षा साळुंके हिला 91 40 टक्के, दिव्या सोनटक्के हिला 91.20, श्रीजा कराळे हिला 91.20, स्नेहल लोमटे हिला 90,40 टक्के, श्रावणी नर्वेकर 90 टक्के गुण मिळवून या विद्यार्थिनी यशस्वी झाल्या आहेत.
शाळेची विद्यार्थिनी समीक्षा गायकवाड हिला संस्कृत विषयात 100 पैकी 100 गुण मिळाले असून सर्वस्तरातून विद्यार्थ्यांवर आनंदाचा वर्षाव होत आहे एकंदर संपूर्ण निकालात मुलींनी बाजी मारली आहे या सर्व मुली अतिशय सामान्य गरीब कुटुंबातल्या आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. कोरोना काळात आई वडीलाची नोकरी गेली तरीही या मुलींनी हार मानली नाही व परिस्थिवर मात करून हे यश संपादन केले आहे. प्रथमआलेली श्रुतिका आंबेकर चे वडील हॉटेल मध्ये कामाला होते कोरोणा काळात काम गेल परिस्थिती हलाकीची झाली तरी या मुलीने हार मानली नाही. आणि यश संपादन केले . एकंदरीत कोरोनाचा काळ , ऑनलाईन शिक्षण व ऑफलाईन परीक्षा कठीण काळ असूनही शाळेने चांगल्याप्रकारे यश संपादन केले. असे शाळेचे मुख्याध्यापक मा. शिवाजीराव माने यांनी सांगीतले. या विद्यार्थ्याना मार्गदर्शक करणारे सुनिता टेकवडे , हेमलता नवले, श्रध्दा जाधव , शितल शितोळे , दिपाली झणझने , भाग्यश्री रापटे , गायत्री साखरे, संध्या पुरोहित, यांनी खुप परिश्रम घेतले .संस्थेचे सचिव तुळशीराम नवले व सर्व संस्था पदाधिकारी यांनी यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे,मुख्याध्यापकांचे हार्दिक अभिनंदन केले. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.