शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
बालाजी लाँन्स येथे महाराष्ट्र राज्य थाई बॉक्सिंग असोसिएशन व पिंपरी चिंचवड शिवसेना अल्पसंख्यांक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने शिवसेना कामगार नेते इरफान भाई सय्यद यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे विभागीय थाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२२ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेला पिंपरी चिंचवड शहर / सोलापूर शहर व सोलापूर जिल्हा तसेच अहमदनगर शहर व अहमदनगर जिल्हा व पुणे शहर / पुणे जिल्हा अशा भागातुन एकूण ६७२ खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला. या स्पर्धा सकाळी ९ :०० वाजता सुरू झाल्या होत्या. या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे शिवसेना कामगार नेते इरफान भाई सय्यद हे आवर्जून उपस्थित राहिले त्याचबरोबर आमदार गौतम चाबुकस्वार साहेब व प्रसिद्ध उद्योगपती मल्लेश शेठ कद्रापुरकर साहेब तसेच पिंपरी चिंचवड उपशहर प्रमुख हरेश जी नखाते साहेब तसेच विश्वजीत बारणे साहेब व जिल्हा संघटिका सौ.सुलभाताई उबाळे, उपजिल्हा प्रमुख बाळासाहेब वाल्हेकर पिंपरी चिंचवड शहरसंघटिका अँड.उर्मिलाताई काळभोर संघटक रोमी संधू व महाराष्ट्र थाई बाँक्सिंग संघटनेचे जनरल सेक्रेटरी एच.डी गायकवाड साहेब हे ही प्रमुख पाहुणे म्हणून आवर्जून उपस्थित राहिले.
या स्पर्धेचे संपूर्ण आयोजन शिवसेना शहर प्रमुख अल्पसंख्यांक व आघाडी चे मा.श्री.हाजी दस्तगीर मनियार साहेब यांनी केले या स्पर्धेचे टेक्निकल डायरेक्टर म्हणून नादीम भाई शेख यांनी सर्व काम पाहिले त्याच बरोबर पंच म्हणून प्रियंका अचमट्टी यांनी उत्तम कामगिरी केली .तसेच या स्पर्धेचे तांत्रिक काम हेमंत कोकाटे / अनिकेत जामदार /तसेच सौ.चेतना वारे-लांभाते /व अमन शर्मा यांनी पाहिले तसेच या स्पर्धेमध्ये सोलापूर शहर व सोलापूर जिल्हाप्रमुख व अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख – श्री.स्वप्नील वारुळे व श्री.रोहित कसबे व पिंपरी चिंचवड शहर चे पदाधिकारी – श्री.अभिषेक शिंदे व पुणे शहर प्रमुख – श्री.निलेश चाटी पुणे जिल्हा प्रमुख – अमोल माने व विनोद कुंजीर हे ही उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये सांघिक विजेतेपद प्रथम क्रमांक -पिंपरी चिंचवड शहर, द्वितीय क्रमांक, पुणे शहर, तृतीय क्रमांक – पुणे जिल्हा, चतुर्थ क्रमांक अहमदनगर जिल्ह्याने पटकविला.
या स्पर्धेमध्ये सहभागी खेळाडुंना प्रमाणपत्र व विजेते खेळाडूंना मेडल देऊन सन्मानित करण्यात आले .ही स्पर्धा अतिशय उत्तम रित्या पार पडली. अशी माहिती संघटनेचे कार्याध्यक्ष महादेव खराडे यांनी दिली.