शबनम न्युज | हैदराबाद (वृत्तसंस्था)
तेलंगणातील सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर गुरुवारी झालेल्या जाळपोळीचा कट रचणारा असल्याच्या संशयावरून आंध्र प्रदेश पोलिसांनी शनिवारी सुब्बा राव नावाच्या एका व्यक्तीला ताब्यात घेतले.
त्याला पुढे रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात येईल, असेही पोलिसांनी सांगितले. याआधी शुक्रवारी पोलिसांनी सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर जाळपोळ केल्याचा आरोप असलेल्या १०० हून अधिक आंदोलकांना अटक केली, असे सूत्रांनी सांगितले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनांची जाळपोळ करणाऱ्या आंदोलकांच्या विरोधात रेल्वे पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता.याआधी शुक्रवारी, रेल्वे पोलिसांनी केंद्राच्या अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ तेलंगणाच्या सिकंदराबादमध्ये रेल्वेला आग लावणाऱ्या आणि रेल्वे मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या आंदोलकांवर गुन्हा दाखल केला.
सुमारे १५०० ते ३००० लोकांनी विरोध केला. त्यांनी दगडफेकही केली ज्यात काही पोलीस कर्मचारी जखमी झाले, असे पोलिसांनी सांगितले. शुक्रवारी केंद्राच्या अग्निपथ योजनेला विरोध करताना आंदोलकांनी सिकंदराबाद रेल्वे स्थानकाची तोडफोड केली आणि ट्रेन पेटवून दिली. आंदोलकांनी ट्रेनच्या खिडक्यांची तोडफोड केली आणि रुळावरील दुचाकी आणि प्लॅटफॉर्मवरील काही पिशव्या पेटवून दिल्या.
आंदोलकांनी सिकंदराबाद बस स्थानकावर TSRTC बसची तोडफोडही केली होती. तेलंगणा पोलिसांनी रेल्वे स्थानकावरील संतप्त जमावाला पांगवण्यासाठी हवाई गोळीबार केला होता.बिहार, उत्तर प्रदेश आणि हरियाणासारख्या देशाच्या इतर भागांमध्ये निदर्शकांनी सलग तिसऱ्या दिवशी निदर्शने केली.