शबनम न्युज | मुंबई
राज्याच्या विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली असून दहावी जागा महाविकास आघाडीच्या खात्यात जाणार की राज्यसभा निवडणुकीप्रमाणे भाजपा चमत्कार घडवणार याबाबत प्रचंड उत्कंठा लागली आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली असून पहिल्या दोन तासांत १५०हून अधिक आमदारांनी मतदान केल्याची माहिती आहे.
शिवसेनेकडून सचिन अहीर, आमशा पाडवी रिंगणात आहेत. तर भाजपाकडून प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उपा खापरे आणि प्रसाद लाड असे पाच उमेदवार निवडणूक लढवत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांना तिकीट दिलं आहे. तर काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप आपलं नशिब आजमावत आहेत.
Advertisement