शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
शिवसेनेचा 56 वा वर्धापन दिन संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात साजरा होत असताना पिंपरी-चिंचवड शहरात मोरे वस्ती चिखली येथे शिवसेनेच्या शाखेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले या उद्घाटन प्रसंगी शिवसेनेचे नेताजी काशीद यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले.या वेळी नेताजी काशिद, रावसाहेब थोरात, सर्जेराव भोसले, संजय गाढवे, सुर्यकांत देशमुख, हरिभाऊ लोहकरे, विजय शिवपुजे, अशोक गायकवाड, संदीप आखाडे, गणेश बिलोणकर, वैभव थोरात, सुमीत तांबे, भागवत शेळके, गोरडे गोविंद आदी उपस्थित होते.
Advertisement