शबनम न्युज | मुंबई
राज्यसभेवेळी भाजपाने मविआच्या मतांवर आक्षेप घेतला होता. यामुळे निकाल रात्री उशिराने जाहीर झाला होता. आता काँग्रेसने भाजपाच्या दोन्ही आजारी आमदारांच्या मतदान प्रक्रियेवरून आक्षेप घेतला आहे. त्यामुळे आता विधानपरिषदेच्या निवडनुकीचा निकाल देखील विलंब होण्याची शक्यता आहे.
यावेळचे मतदान हे गुप्त पद्धतीने होते. राज्यसभेचे मतदान हे वेगळ्या पद्धतीचे होते. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काँग्रेसकडूनभाजपाच्या आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या मतदानावर आक्षेप घेण्यात आला. तशी तक्रार काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली. यावर केंद्रीय निवडणूक आयोगाची दिल्लीत बैठक सुरु झाली आहे. याच्या निर्णयानंतर मतमोजणी सुरु होईल.
Advertisement