शबनम न्यूज | मुंबई (वृत्तसंस्था)
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची कोविड-१९ चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांना उपचारासाठी बुधवारी मुंबईतील एचएन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील राजकीय संकटानंतर शिवसेनेचे बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांना ४० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला होता.
Maharashtra Governor BS Koshyari tests COVID-19 positive, admitted to hospital
AdvertisementRead @ANI Story | https://t.co/maEMGMfF4s#Maharashtra #MaharashtraGovernor #COVID19 #bignews pic.twitter.com/nVo7RUGpe5
— ANI Digital (@ani_digital) June 22, 2022
बंडखोर पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ३३ शिवसेना आणि सात अपक्ष आमदार बुधवारी भाजपशासित आसाममधील गुवाहाटी येथील एका लक्झरी हॉटेलमध्ये दाखल झाले. शिवसेनेतील बंडखोरीमुळे महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी शिंदे यांच्यासह इतर आमदार भाजपमध्ये सामील होतील, अशी शक्यता बळावली आहे.
शिवसेनेचे आमदार आता शहरातील रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये मुक्कामाला आहेत. येथे एकूण ४० आमदार उपस्थित आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व आम्ही घेऊन जाऊ, असे शिंदे यांनी गुवाहाटी येथे आल्यानंतर सांगितले.शिवसेना आमदारांचे भाजप आमदार सुशांत बोरगोहेन आणि भाजप खासदार पल्लब लोचन दास यांनी गुवाहाटी विमानतळावर स्वागत केले.