शबनम न्युज | पिंपरी
भारतीय जनता पार्टी मी विधानसभा निवडणुकीमध्ये पिंपरी-चिंचवड शहराच्या उमा खापरे यांना उमेदवारी दिली व त्या जिंकूनही आल्या. पिंपरी-चिंचवड शहराला महिला आमदार पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीच्या वतीने मिळाल्या. पिंपरी-चिंचवड शहरात पहिल्या महिला आमदार म्हणून सौ. उमा खापरे या आमदार झाल्या बद्दल त्यांचा शहर भाजप वतीने जंगी स्वागत व सत्कार करण्यात आले.
२३ जून रोजी शहरातील भक्ती-शक्ती चौक ते पक्ष कार्यालय अशी भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी मध्ये भाजपचे आजी-माजी कार्यकर्ते, नगरसेवक, आमदार, शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. तसेच दुपारी चार वाजता भाजप शहर कार्यालयात पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आमदार सौ उमा खापरे यांचे स्वागत करीय सत्कार केले.
तसेच सायंकाळी सात वाजता सौ. उमा खापरे यांचे निवासस्थानी विजयाचा जल्लोष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या जल्लोष कार्यक्रमात भाजपचे माजी नगरसेवक विजय उर्फ शितल शिंदे यांनी आमदार सौ. उमा खापरे यांचा विशेष सन्मान केला. व शहर भाजप वतीने त्यांचे अभिनंदन केले. यावेळी आमदार तथा शहराध्यक्ष महेश लांडगे , माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, माजी नगरसेवक शंकर शेठ जगताप, माजी खासदार अमर साबळे,प्राधिकरणचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे, माजी नगरसेवक एकनाथ पवार, माजी सभागृहनेते नामदेव ढाके, माजी नगरसेविका अनुराधा गोरखे, माजी नगरसेवक माऊली थोरात, माजी नगरसेवक राजू दुर्गे, माजी नगरसेवक केशव घोळवे आदी मान्यवर उपस्थित होते.