शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला आणि आयुक्त राजेश पाटील यांना राज्य निवडणूक आयोगाने दणका दिला आहे. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी तयार केलेली प्रभागरचना नियमबाह्य आणि चुकीच्या पध्दतीने केल्याचा राजकीय हस्तक्षेप झाल्याचा आरोप केला होता. त्यांच्या तक्रारीची राज्य निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. तक्रारी गंभीर स्वरूपाचे असल्यामुळे गोपनीय चौकशी करून एका आठवड्यात अहवाल पाठवा, असे आदेश पिपंरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना दिले आहेत.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभागरचनेला स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी मा. उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करत आव्हान दिले आहे. या याचिकेबरोबर विलास मडिगेरी यांनी महामहीम राज्यपाल आदरणीय. भगतसिंह कोश्यारी, भारत निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग आणि विभागीय आयुक्तांकडे प्रभागरचनेतील चुकांबाबत पुराव्यासह तक्रारी केल्या होत्या. त्यानंतरही वारंवार अनेक स्मारणपत्रेही दिली होती. न्यायालयीन लढा सुरू असताना या प्रकरणात विलास मडिगेरी यांच्या तक्रारींची राज्य निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अ. तु. सणस यांनी पिंपरी-चिचंवड महापालिका आयुक्तांना या संदर्भात महत्त्वाचे आदेश दिले आहेत. विलास मडिगेरी यांनी २५ नोव्हेंबर २०२१ आणि १८ फेब्रुवारी २०२२ रोजी तक्रारी केल्या आहेत. सदर अर्जातील तक्रारी गंभीर स्वरुपाच्या आहेत. त्याबाबत तातडीने गोपनीय चौकशी करून एका आठवड्यात याबाबतचा अहवाल सादर करावा, असे निर्देश दिले आहेत.
या संदर्भात विलास मडिगेरी म्हणाले की, प्रारुप प्रभागरचना प्रसिध्द होण्याच्या ३ महिनेपूर्वी २५ नोव्हेंबर २०२१ रोजी अस्तित्वातील प्रभाग क्रमांक ८ चे तीन भागात चुकीच्या पध्दतीने मोडतोड होणार सेक्टर १ चा संपूर्ण भाग तोडणार विभाजन करणार तसेच 61 मीटर टेल्को रस्ता ओलांडून नवीन भाग विठ्ठलनगर लांडेवाडी ( झोपडपट्टी ) जोडणार असल्याचे लेखी तक्रार आपण महामहीम राज्यपाल आदरणीय. भगतसिंह कोश्यारी, भारत निवडणूक आयोग, आणि राज्य निवडणूक आयोगाकडे यासर्वांकडे केली होती.
त्यानंतर दिनांक 14/02/2022 रोजी हरकत नोंदवून व दि:25/02/2022 रोजी सुनावणीत बाजू मांडल्यानंतर कोणताही ठोस बदल झाला नाही. प्रारूपनंतर अंतिम प्रभागरचनेतत आरक्षण बदलाची तरतूद नियमात नाही. परंतु प्रभाग २ मध्ये एससी आरक्षण नव्हते. सरासरी पेक्षा १० टक्के कमी म्हणजे ३३५५९ लोकसंख्या अपेक्षित आहे. परंतु त्याही पेक्षा १३९८ नी लोकसंख्या कमी करून ३२१६१ केले आहे. प्रभाग ५ मध्ये एसटी आरक्षण होते. जाणून बुजून हेतुपुरस्सर कोणास तरी डोळ्यासमोर ठेवून एसटी आरक्षण ५ मधून कमी करून घेतली आहे. सदर एसटी आरक्षण काढण्यासाठी ५१५४ लोकसंख्या प्रभाग ५ मधून काढून प्रभाग ७ मध्ये टाकले आहे. त्यामुळे ७ ची लोकसंख्या सरासरी १० टक्के पेक्षाही जास्त म्हणजे ४१०१७ अपेक्षित आहे. परंतु, त्याही पेक्षा १२३४ नी वाढ केली आहे. म्हणजे ४२२५१ लोकसंख्या झाली आहे. जनगणना २०११ च्या ईबीनुसार प्रभाग केले. हे ईबी निवडणूक आयोगाने चुकीची ठरविली आहेत.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने प्रभागरचनेतील नियमांचे उल्लंघन केले आहे. जाणून बुजून हेतुपुरस्सर कोणास तरी डोळ्यासमोर ठेवून विविध बदल केले. नियमबाह्य पध्दतीने प्रभागरचना बनविताना गोपनियतेचा भंग व राजकीय हस्तक्षेप झालेला आहे. या संदर्भात सर्व पुरावे सादर व नियमांच्या आधारे तक्रार करत योग्य ती कार्यवाही करण्याबाबत सातत्याने बाजू मांडली होती अनेक स्मरण पत्रे दिली होती त्याची आता आयोगाने दखल घेतली असून योग्य कारवाई होऊन न्याय मिळेल, असे विलास मडिगेरी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.