शबनम न्युज | पुणे (वृत्तसंस्था)
फायनान्शियल सोल्युशन कंपनीत काम करणाऱ्या ३१ वर्षीय व्यक्तीला त्याच्या कनिष्ठ सहकारीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. पहिल्यांदा घरी दारू पाजल्यानंतर आणि नंतर तिचे फोटो प्रसारित करण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणी २० वर्षाच्या महिलेने हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हा व्यक्ती बावधनमध्ये राहतो आणि मूळचा बिहारचा आहे. शनिवारी उशिरा नोंदवलेल्या फिर्यादी नुसार, आरोपीने ६ आणि १० जून रोजी महिलेवर बलात्कार केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ जून रोजी आरोपीने तिला आपल्या घरी जेवायला बोलावले, व्हिस्की दिली आणि तिच्यावर बलात्कार केला. १० जून रोजी त्याने तिला आपल्या घरी बोलावून तिचे फोटो प्रसारित करण्याची धमकी दिली आणि तिच्यावर बलात्कार केला. २५ जून रोजी पहाटे २.३० वाजता त्याने तिला पुन्हा फोन केला, त्यानंतर तिने पोलिसांशी संपर्क साधला.
पोलिसांनी आरोपींवर आयपीसी कलम ३७६ (२)(एन) नुसार वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी आणि ३५४ (अ) लैंगिक छळ केल्याबद्दल आणि गुन्हा करण्याच्या उद्देशाने विष देऊन दुखापत केल्याबद्दल ३२८ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू असल्याचे हिंजवडी पोलिस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी सांगितले.