शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
भोसरी विधानसभा मतदारसंघातून प्रभाग क्रमांक १३ मधील शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी साने चौक येथे आंदोलन करीत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील बंडखोर आमदारांचा निषेध करण्यात आला. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबाबत एकनिष्ठ रहाण्याची ग्वाही दिली. यावेळी एकनाथ शिंदे व फुटीर आमदारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आप आगे बढो हम आपके साथ है’, अशा घोषणांनी साने चौक दुमदुमून सोडला.
भोसरी विधानसभा संपर्कप्रमुख केसरीनाथ पाटील, उपजिल्हा प्रमुख निलेश मुटके, शिवसेनेचे उपशहरप्रमुख नेताजी काशीद, अनिल सोमवंशी, संघटक रावसाहेब थोरात, जिल्हा समन्वयक राहुल भोसले, महिला आघाडी संघटीका साधना काशिद, दादा नरळे, संजय गाढवे, युवराज कोकाटे, प्रविण पाटील, हरिभाऊ लोहकरे, दादा ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी सर्जेराव भोसले, शैलेश मोरे, ऋषींकेश जाधव, सुजित साळवी, अशोक गायकवाड, चंद्रकांत जाधव, विजय शिवपुजे, गोविंद गोरडे, वैभव छाजेड, अनंत मते, आनद हिंगे, सुर्यकांत देशमुख, सुखदेव देवकर, विलास टकले, संदिप आखाडे, चेतन सावंत, संतोष गावडे, वैभव जाधव, संगमेश्वर मुळे, वैभव थोरात, सुमंत तांबे, अनिता तळेकर, पल्लवी हेपट, तुलसी सांगडे, महानंदा सपकाळ, सुजाता तांबे, ज्योती तांबे,सुजाता सुरवसे, छकुली पाटील, राणी सातपुते, मेघा कदम आदी उपस्थित होते.