शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
मंगळवार (दि.२८) रोजी माध्यमिक विद्यालय रावेत येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या इयत्ता नववीच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना महापालिकेच्या तालेरा हॉस्पिटल मार्फत कोविड लसीकरणाचा दुसरा डोस देण्यात आला. त्याच बरोबर प्राथमिक व माध्यमिक शाळेतील २००८ जन्मतारीख असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना लसीकरणाचा दुसरा डोस देण्यात आला. तेव्हा तालेरा हॉस्पिटल चिंचवडच्या डॉक्टर श्रीमती सीमा बडे, शुभम भोसले (DED), कल्पना कांबळे – सिस्टर, अविनाश मांढरे -वॉर्डबॉय यांच्या नियंत्रणाखाली माध्यमिक विद्यालय रावेत मधील 94 विद्यार्थ्यांना करोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा दुसरा डोस दिला . तेव्हा माध्यमिक शाळेचे इन्चार्ज रामेश्वर पवार, रोकडे पूजा, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक स पेकर सर, घुगे पांडुरंग , जाधव मॅडम , साठे सर आणि वीर सर या सर्व वर्ग शिक्षकांनी आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना लसीकरणाचे महत्त्व सांगून दुसरा डोस घेण्यास सहकार्य करून लसीकरणाची मोहीम यशस्वीपणे पार पाडली.
तालेरा हॉस्पिटलच्या डॉक्टर श्रीमती सीमा बडे, शुभम भोसले ,कल्पना कांबळे ,अविनाश मांढरे या सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे पवार रामेश्वर सरांनी आभार मानले.