शबनम न्युज | मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी महाविकास आघाडीची बैठक बोलावण्यात आली होती. महाविकास आघाडीच्या या बैठकीत शरद पवारांनी काही महत्वाच्या सूचना दिल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व कायदेशीर मार्ग अवलंबून पाहायचे. तसेच संध्याकाळी ५ वाजता सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय येईल, त्यानंतर पुढील रणनीती ठरवण्यात येईल, असं बैठकीत ठरविण्यात आले. जर फ्लोअर टेस्टची वेळ आली तर त्याला सामोरे जायचं. शेवटपर्यंत महाविकास आघाडी टिकावी, यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची, चर्चा बैठकीत झाल्याची माहिती समोर आली आहे.
या बैठकीत काँग्रेस सुनील केदार, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नितीन राऊत उपस्थित होते. तर राष्ट्रवादीचेही महत्वाचे नेत्यांनी या बैठकीला हजेरी लावली होती. मात्र शिवसेनेचे कोणतेही नेते यावेळी उपस्थित नव्हते.