शबनम न्युज | मुंबई
शुक्रवार दिनांक १ जुलै २०२२ रोज़ी “विशाल काळभोर युवा मंच” आयोजित १ जुलै जागतिक “डॉक्टर डे” निमित्त व कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी समर्पण भावनेने अविरत काम करणाऱ्या सर्व डॉक्टर्सना राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या निमित्त डॉक्टरांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी कै.ह.भ.प.प्रभाकर मल्हारराव कुटे स्मुर्ती रुग्णालय आकुर्डी डॉ.बाळासाहेबजी पा.होडगर, डॉ.प्रतिभाताई लोखंडे, वैद्यकिय अधिकारी डॉ.अनिलजी रॉय, आशा किरण हॉस्पिटलचे डॉ.रोहितजी शुक्ला, डॅा.दीपकजी उजगरे, डॅा.रेखा उजगरे, डॉ.उदयजी करांडे, डॉ.निलेशजी आगवेकर, डॉ.विशालजी देशमुख, डॉ.विजयजी माने, डॉ.शितलची कुंभार, डॉ.स्नेहल घोडके, डॉ. अर्जुनजी पोखरकर, डॉ.तानाजी कड, डॉ. सुर्यकांत भोईटे, डॉ.अनिलजी लोखंडे, डॉ.स्नेहल तुप्रेवार, डॉ.अभयजी तांबिले, डॉ.गणेशजी अंबिके, डॉ.सरोज अंबिके, डॉ.शगुफ्ता तरासगार, डॉ.दिलीप गायकवाड, डॉ.संयुक्ता रॉय, डॉ.सुजितजी श्रॉफ, डॅा.शरदजी पोले आदी डॉक्टरांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी सरस्वती (माऊशी) ग़ोफणे, अतुल चव्हाण, सचिन मोकाशी, निखिल पवार, विकास ठाणांबीर, विशाल सजगणे, मोहित धिवार, साजीत शेख़, इब्राहीम शेख़, अभय भोसले, किरण मोरे, आकाश शिंदे आदी उपस्थित होते.