शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
बारामती लोकसभा मतदार संघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या, संसदरत्न खासदार सुप्रिया ताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड शहर महिला अध्यक्षा कविता ताई आल्हाट यांच्या नेतृत्वाखाली ‘झाडे लावा झाडे जगवा’ हा उपक्रम संपूर्णन शहरात राबवण्यात येत आहे.
पिंपरी ,चिंचवड,भोसरी अशा तीनही विधानसभेत हा वृक्षारोपणाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहेत. यानिमित्त शहर अध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले. तसेच या उपक्रमाला स्थानिक नागरिकांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे .
यावेळी महिला शहर अध्यक्षा कविता ताई आल्हाटनयांनी नागरिकांना झाडांचे महत्त्व समजावून सांगताना, झाडे आपल्याला प्राणवायू देतात आणि आपण पर्यावरणाचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे, असे सांगितले. यावेळी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर महिला पदाधिकारी ,कार्यकर्ते, स्थानिक महिला ,नागरिक उपस्थित होते.