शबनम न्युज | मुंबई
विधानसभेच्या दोनदिवसीय विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल नार्वेकर, तर शिवसेनेचे राजन साळवी यांच्यात लढत होणार आहे. भाजपचे १०६ तर अपक्ष, छोटे पक्ष असे एकूण १२० आमदार भाजपच्या गटात आहेत. शिंदे यांच्याबरोबर अपक्षांसह ४६ आमदार आहेत. विधानसभेत सरकारला १७० पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा मुख्यमंत्री शिंदे यांनी केला आहे.
विधानसभेत निवडणुकीला सुरुवात झाली आहे. राहुल नार्वेकर आणि राजन साळवींच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला. चंद्रकांत पाटील यांनी राहुल नार्वेकर यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला तर राजन साळवींसाठी थोपटेंनी प्रस्ताव मांडला. आवाजी मतदानानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात करण्यात आली आहे. तसेच राहुल नार्वेकरांना १६४ मतं मिळाली तर राजन साळवींच्या मतांची मोजणी सुरू आहे.
तसेच अजित पवार आणि छगन भुजबळ कोरोनामुक्त झाले असून विधानसभा अधिवेशनासाठी उपस्थित आहेत.