शबनम न्युज | मुंबई
विधानसभेच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी आज निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपचे राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यावेळी बोलताना सुधीर मुंनगंटीवार म्हणाले कि, “या सभागृहाचं कामकाज उत्तम होण्यासाठी आदित्य ठाकरे गुरुदक्षिणा देऊ शकतील. उरलेले इतरही देतील,” असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी दिला आहे.
“राहुल गांधींचा आदेश आला की तुम्ही झोपता पण या राहुल गांधींचं ऐकाल अशी आशा असल्याचंही ते म्हणाले. जावई हा देवासमान असतो ही आपल्या शास्त्रातील भावना आहे. त्यामुळे वरील सभागृहात काही अडणार नाही असा मला विश्वास आहे,” असं सुधीर मुंनगंटीवार म्हणाले आहेत.
तसेच यावेळी बोलताना ते म्हणाले, अजित पवार म्हणाले मुख्यमंत्री बनण्याविषयी माझ्या कानात सांगितलं असत तर आम्ही मुख्यमंत्री केलं असत. अजितदादा तुम्हाला वाटलं मुख्यमंत्री व्हावं तर मी सांगतोय येऊन आमच्या कानात सांगा असा टोलाही सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला. जयंत पाटील यांच्या कानात मात्र सांगू नका असंही ते मिश्कीलपणे म्हणाले.