शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
शिवसेना मा. नगरसेविका मीनलताई विशाल यादव यांच्या वाढदिवसानिमित्त दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा शनिवार दि. २/७/२२ रोजी शनिवार सायंकाळी ६ वाजता जिजामाता सांस्कृतिक भवन मोहननगर येथे संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूजन , पुष्प हार अर्पण करून ,करण्यात आली. परिसरातील दोनशे विद्यार्थ्यांचा शाल श्रीफळ, फाइल फोल्डर व पेन देऊन सन्मानित करण्यात आले .
या कार्यक्रमात परिसरातील ज्येष्ठ शिक्षिका डॉ विजय श्री मेहता, कांतिलाल खिंवसरा शाळेची प्राध्यापक राविद्र शिंदे सर, सामाजिक कार्यकर्त्या सुमनताई नामदे,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष पागळे, आनंदनगर शिवसेना विभागप्रमुख संदीप कुऱ्हाडे ,ज्येष्ठ शिवसैनिक के एम रेड्डी, शाखाप्रमुख विनोद धोत्रे ,शिवसेना मोहननगर उपविभागप्रमुख सोमनाथ अलंकार, शाखाप्रमुख नागेश नामदे, युवासेना संघटक रोहन (बाबू) नामदे ,दिपक संमिदर या मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी ज्येष्ठ शिक्षिका मेहता मॅडम त्यांच्या मनोगतात “माणुस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो त्याची परीक्षा कधी संपल्याने नसती ४८ व्या वर्षीसुद्धा शिक्षण घेत आहे व विविध पदांच्या परीक्षा देत आहे .” त्यानंतर सुभाषची पागळे, शिंदे सर, सुमनताई नामदे यांचं अतिशय मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना झाले .
या वेळेस अनेक विद्यार्थ्यांनी पुढील आयुष्यात आपण काय काय करणार, या बद्दल आपल्या भूमिका मांडल्या. तसेच अनेक पालकांनी या कौतुक सोहळा आयोजन केल्याबद्दल मिनल यादव यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय मोरे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना शाखा मोहननगर ,अष्टविनायक मित्र मंडळ व शिवसेना संघटक विशाल यादव यांनी केले व आभार मानले .