शबनम न्युज | पुणे
पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने बिबवेवाडी परिसरात एका फ्लॅटमधून सुमारे एक किलो सोने आणि तीन किलो चांदीचे दागिने चोरल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक केली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी रविवारी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० जून रोजी बिबवेवाडी परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये घरातील सर्व सदस्य कुत्र्याचे पिल्लू विकत घेण्यासाठी बाहेर पडले असताना घर फोडल्याची घटना घडली. चोरट्याने बाल्कनीच्या खिडकीचे ग्रील वाकवून घरात प्रवेश करून सोन्या-चांदीचा मौल्यवान ऐवज लंपास केला होता. बिबवेवाडी पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
शनिवारी, गुन्हे शाखेच्या युनिट-१ चे अधिकारी जे चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या संशयितांची माहिती गोळा करत होते. घरफोडीच्या अनेक गुन्ह्यांमध्ये हवा असलेला हिस्ट्री शीटर कोंढवा येथील खडीमशीन परिसरात नातेवाईकाला भेटण्यासाठी येत असल्याची माहिती मिळाली.
माहितीच्या आधारे, परिसरात सापळा रचण्यात आला आणि शकील अन्सारी (वय.३४ ) उर्फ बोना उर्फ मुस्तफा या संशयितास अटक करण्यात आली. त्याच्या चौकशीत बिबवेवाडी फ्लॅट फोडण्यात त्याचा सहभाग उघड झाला. अन्सारीला पुढील तपासासाठी बिबवेवाडी पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.
अन्सारी हा गुन्हेगार असून त्याच्यावर पुण्यातील खडक, वानवडी, कोंढवा आणि मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात तसेच हैदराबाद पोलिसांत तब्बल १८ गुन्हे दाखल आहेत. असे गुन्हे शाखेच्या युनिट-१ चे प्रभारी निरीक्षक संदीप भोसले यांनी सांगितले.