शबनम न्युज | मुंबई
आज विधानसभेच्या दुसऱ्या दिवशीच्या अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. आज विश्वासदर्शक ठराव विधानसभेच्या विशेष अधिवेशनात मांडण्यात आले यात शिंदे सरकारला आपलं बहुमत सिद्ध करावं लागलं. यात शिंदे-भाजपा सरकारने पहिली लढाई जिंकल्यानंतर आता विश्वासदर्शक ठरावही जिंकला आहे. रविवारी अध्यक्षपदाच्या निवडणुकीची पहिली लढाई शिंदे सरकारनं जिंकली आणि भाजपाचे उमेदवार राहुल नार्वेकर १६४ मतांनी अध्यक्षपदी विराजमान झाले.
तसेच शिंदे सरकारच्या बहुमत चाचणीला सुरुवात झाली असून शिरगणतीद्वारे आमदारांची संख्या मोजणी करण्यात आली. तसेच शिंदे सरकारनं बहुमत चाचणीत तब्बल १६४ मतं मिळवली आहेत. तर शिवसेनेला बहुमत चाचणीत फक्त ९९ मतं मिळाली आहे.
Advertisement