शबनम न्युज | मुंबई
आज विधानसभेच्या दुसऱ्या दिवशीच्या अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. आज विश्वासदर्शक ठराव विधानसभेच्या विशेष अधिवेशनात मांडण्यात आले यात शिंदे सरकारला आपलं बहुमत सिद्ध करावं लागलं. यात शिंदे-भाजपा सरकारने पहिली लढाई जिंकल्यानंतर आता विश्वासदर्शक ठरावही जिंकला आहे. तर महाविकास आघाडीच्या ४ आमदारांना मतमोजणीस उपस्थित राहता आले नाही.
आमदार अशोक चव्हाण,आमदार विजय वडेट्टीवार, आमदार अण्णा बनसोडे, आमदार संग्राम जगताप सभागृहाबाहेरच असल्याने त्यांना मतमोजणीला उपस्थित राहता आले नाही. मतमोजणीसाठी सभागृहाचे दरवाजे बंद करण्यात आल्याने या आमदारांना सभागृहात जाण्यास परवानगी देण्यात आली नाही.
Advertisement