शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
दहावी- बारावीच्या परीक्षा संपता-संपताच घराघरात विद्यार्थ्यांचे करिअर, पुढील शिक्षण याविषयी चर्चा सुरू होते. मात्र, अनेकदा विद्यार्थ्यांप्रमाणेच पालकही याबाबत संभ्रमात असतात. डोळसपणे सर्व बाबींचा विचार करून आणि योग्य मार्गदर्शन घेणे महत्त्वाचे आहे. आज उच्च शिक्षणाला स्पेशलायझेशन, स्किल बेस्ड लर्निंग तसेच मल्टी डिसिप्लिनरी अॅप्रोच या महत्त्वाच्या घटकांची जोड मिळाली आहे. योग्य माहिती आधाराने जाणीवपूर्वक निवडलेले करिअर केवळ विद्यार्थ्यांची बौद्धिक, नैतिक क्षमता वाढवत नाही, तर देशाची सामाजिक, आर्थिक बाजूदेखील बळकट करत असते. या करिता तज्ञांचे मार्गदर्शन महत्वाचे ठरते .
पिंपरी चिंचवड एज्युकेशन सोसायटीच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक सभागृहात करिअर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यामध्ये मार्गदर्शक मा. अमजद खान (संचालक पिकअप बिझ सॉफटवेर ,नांदेड ) व मा. नौशाद शेख (संचालक -क्रिएटिव्ह ऍकेडमी ,निगडी ) यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी शिक्षणाच्या विविध संधी कशा निवडाव्या याचे मार्गदर्शन केले .
विद्यार्थ्यांनी नेहमी अनुभवातून शिक्षण घ्यावे शिक्षण हा एकमेव प्रगतीचा मार्ग आहे योग्य शिक्षण आणि उच्च ध्येय प्रत्येक विद्यार्थ्याने बाळगले पाहिजे आयुष्यातील संकटावर मात करत शिक्षणाच्या आधारे आपले जीवन सुखकर करावे असे मत पिंपरी चिंचवड एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष अकील मुजावर यांनी व्यक्त केले . यावेळी गुणवंत विद्यार्थाना सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला .
पिंपरी चिंचवड एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष अकील मुजावर,निवृत्त पोलीस अधीक्षक (GST) जलील शेख , निवृत्त पोलीस अधिकारी गुलाम मोहम्मद शेख , सहाय्यक शिक्षण अधिकारी रजिया खान , रयत विद्यार्थी विचार मंच अध्यक्ष धम्मराज साळवे , महासचिव संतोष शिंदे ,एम आय एम महिला शहर अध्यक्ष रुहीनाज शेख , ,डॉ . मशमुम ,वि एम कबीर ,लतीफ सय्यद ,अल्ताफ शेख , इम्तियाझ खान ,अकिब शेख ,शब्बीर शेख ,नादीर बेग ,मौलाना अब्दुल शकूर नदवी , अब्दुल रौफ कुरेशी , खालिद मुजावर , वाजेद कमाली ,सकलेन कमाली , उमर मुजावर प्रमुख उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सद्दाम हुसेन ,प्रस्तावना गुलाम मोहम्मद शेख , आभार शफिउल्ला काझी यांनी केले .