शबनम न्युज | मुंबई
आज विधानसभेच्या दुसऱ्या दिवशीच्या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. सभागृहातील सदस्यांकडून त्यांचं अभिनंदन करण्यात आलं. तसेच याबद्दल उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अजित पवार यांचे अभिनंदन केले.
आज विधानसभेच्या दुसऱ्या दिवशीच्या अधिवेशन झाले. आज विश्वासदर्शक ठराव विधानसभेच्या विशेष अधिवेशनात मांडण्यात आले यात शिंदे-भाजपा सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे.
Advertisement