श्री सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,आकुर्डी पुणे -३५ या शाळेत इयत्ता ५ वी ते ७ वी च्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी निमित्त शाळेत मोठ्या थाटामाटात ग्रंथ दिंडी काढली.सर्व विद्यार्थी वारकरी वेशात आले होते तसेच विठ्ठल – रुख्मिणीचा वेश परिधान केला होता.७ वी मधील विद्यार्थिनी कु.तेजश्री निंबाळ हिचे भाषण झाले.सर्व विद्यार्थ्यांनी विठ्ठलाचे विविध अभंग सादर केले.पालखी सोहळ्याचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.
सौ.प्रतिमा काळे मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले.शाळेचे मा.व्यवस्थापक,संस्थापक मा.श्री.गोविंद दाभाडे सर,प्राचार्या सौ.साधना दातीर मॅडम,उपप्राचार्य श्री.विजय बच्चे सर,पर्यवेक्षक श्री.प्रदीप काळोखे सर,पर्यवेक्षिका सौ.आहेर मॅडम,शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,पालक उपस्थित होते.मा.दाभाडे सरांनी सर्वांना मार्गदर्शन केले..अन् आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.