पुराव्यासह तक्रारीमुळे राज्य निवडणूक आयोगाने घेतली दखल
शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक प्रशासनाने याद्या फोडताना नियमानुसार व्यवस्थित काम केले नाही. हेतुपुरस्सार, कोणाच्या तरी रांगण्यावरून, राजकीय दबावाखाली, राजकीय हस्तक्षेप होवून, प्रभाग क्रमांक 11 मध्ये अपेक्षित असणारे हजारो नावे 6000 ते 8000 नावे कमी करून प्रभाग क्रमांक 10 व प्रभाग 3, मध्ये टाकली असल्याची दाट शंका उपस्थित केली होती. या संदर्भात 8000 पैकी काही उदाहरणं म्हणून पुराव्यासह 556 मतदारांचे संपूर्ण नाव, संपूर्ण पत्ता, भाग क्रमांक, अनुक्रमांक, त्यांचे Epic आय डी, संपूर्ण माहितीसह यादी 22/06/2022 रोजी प्रारूप प्रसिद्धीच्या एक दिवस अगोदर लेखी तक्रार ई मेल वर आणि प्रत्यक्ष शंका /तक्रार पत्र मा.राज्यपाल महोदय, राज्य निवडणूक आयोग, भारत निवडणूक आयोग, पुणे विभागीय आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, म न पा आयुक्त या सर्वाकडे दिली /केली होती.
सदर पुराव्यानिशी तक्रारीची दखल राज्य निवडणूक आयोगाने घेतली आहे. या संदर्भात आक्षेपाबाबत उचित कार्यवाही करण्याचे दि: 30/06/2022 रोजी च्या लेखी आदेश पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना दिल्याचे भाजपचे पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी सांगितले आहे.
23/06/2022 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली त्यानंतर उदाहरण म्हणून दिलेल्या 556 मतदारांचे नावे तपासली असता 556 नावापैकी
त्यातील 363 नावे अन्य प्रभागात म्हणजे प्रभाग 3 मध्ये 9 मतदार, 4 मध्ये 4 मतदार, 9 मध्ये 85 मतदार, 10 मध्ये 265 मतदार टाकल्याचे स्पष्ट झाले आहे.
मतदार याद्यामध्ये 6000 ते 8000 हून अधिक मतदारांचे नावे ही राजकीय दबावापोटी, राजकीय हस्तक्षेप होऊन मतदार याद्यांमध्ये फेरफार करून सध्याच्या अंतिम प्रभाग क्रमांक 11 मध्ये अपेक्षित असणारे यामध्ये सेक्टर 3,4,6,7,9,10,11 व 13, तसेच जय गणेश साम्राज्य, नारायण हठ सोसायटी, प्रिन्सेस विल्ला सोसायटी, पांजारपोळ समोरील गुरुविहार कॉलनी, लांडगेनगर व अन्य अशा या भागातील वास्तव्यास असणारे किती तरी हजारो मतदारांचे नावे खूप मोठ्या प्रमाणात प्रभाग 3 मध्ये -1974 मतदार,
4 मध्ये – 602 मतदार, 9 मध्ये -870 मतदार, 10 मध्ये -3135 मतदार, 12 मध्ये 74 मतदार, 16 मध्ये – 102 मतदार. असे एकूण 6755 मतदारांचे नावे वरील अन्य प्रभागामध्ये टाकले आहेत.
आम्ही 22/06/2022 रोजी 6000 te 8000 मतदार दुसऱ्या प्रभागात टाकल्याचे लेखी पत्राद्वारे शंका व्यक्त केली होती त्यातील 6755 मतदारांची राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या फॉर्म मध्ये हरकत शेवटचे दि: 3/07/2022 रोजी पुराव्यानिशी हरकत आम्ही घेतली तसेच प्रत्येक मतदाराचा संपूर्ण नाव पत्त्याचा पुरावा म्हणून प्रत्येकाचा मिळकतकर झेरॉक्स सोबत दिला आहे झेरॉक्सचे एकूण ७००० पानांक सोबत जोडले आहेत.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक प्रशासनाने तयार केलेल्या प्रभागरचनेबाबत 25 नोव्हेंबर 2021 रोजी लेखी शंका व तक्रारपत्र दिले होते. त्या प्रमाणेच हेतुपुरस्सार प्रभागाची फोडाफोड करून प्रभागरचना केली होती. त्याची तक्रार व पाठपुरावा करून आणि सुनावाणी प्राधिकृत अधिका-यांकडून न्याय मिळाला नाही. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयात याचिका 6250/ 2022 द्वारे दाखल केली आहे. त्याची सुनावणी चालू आहे. निर्णय प्रलंबित आहे.
तसेच या संदर्भात राज्य निवडणूक आयोगातर्फे आमच्या मूळ तक्रारी 25/11/2021 व 18/02/2022 रोजीच्या गंभीर स्वरूपाचे आहेत म्हणून महानगरपालिका आयुक्त यांना चौकशी आदेश देवून गोपनीय अहवाल पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यानंतर प्रभागरचनेप्रमाणेच इंद्रायणीनगर प्रभागाच्या मतदार याद्या विभाजन देखील हेतुपुरस्कर केले गेले आहे. निवडणूक प्रशासनाने याद्या फोडताना नियमानुसार व्यवस्थित काम केले नाही हे स्पष्ट दिसून येतो आहे.
22/06 रोजी तक्रार राज्य निवडणूक आयोगाकडे केली होती. या तक्रारीची दखल राज्य निवडणूक आयोगाने घेतली आहे. या संदर्भात पिंपरी चिंवड महापालिका आयुक्त यांना तक्रारीबाबत कार्यवाही करून कळविण्याचे निर्देश दिले आहेत. संपूर्ण प्रभागरचना तयार करताना आणि मतदार याद्या फोडताना निवडणूक यंत्रणेचे चुकीचे कामकाज केले आहे. वारंवार चुका निदर्शनास आणून देत प्रशासनाच्या कामकाजात सुधारण झालेली नाही. चुकीच्या कार्यप्रणालीचा पुन्हा बुरखा फाटलेला आहे. निवडणूक यंत्रणेने योग्यरित्या व नियमानुसार निवडणुकीचे कामकाज करावे. अन्यथा महानगरपालिका निवडणूक यंत्रणेचा अनागोंदी कारभार थोपविण्यासाठी आणखी कायदेशीर लढा द्यावा लागेल, असेही विलास मडिगेरी यांनी नमूद केले आहे.