शबनम न्युज | मुंबई
उद्धव ठाकरेंना म्हणजेच शिवसेनेला आज अजून एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे कोकणातील ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामदास कदम यांच्या शुभेच्छा आमच्यासोबत आहेत, असे म्हटले. ‘रामदास कदम यांच्या शुभेच्छा आमच्यासोबत होत्या, त्यांचे पुत्र आमदार योगेश कदम हे आमच्यासोबतच आहेत. आता, मी रामदास कदम यांना बोलतो,’ असे म्हणत कदम यांच्या नाराजीवर एकनाथ शिंदेंनी आपली भूमिका स्पष्ट केली.
शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेतून अनेक नेते आणि शिवसैनिक शिंदेंना समर्थन देत आहेत. नुकतेच रामदास कदम यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला असून मी त्यांना बोलणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
Advertisement