शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरात गेल्या काही दिवसापासून पिण्याचे पाणी गढूळ येत आहे. पहिलेच नागरिकांना दिवस आड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असताना आता गढूळ पाणी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आहे. महानगरपालिका वतीने लवकरात लवकर या पाण्याच्या समस्या वर तोडगा काढावा, याकरिता पिंपरी चिंचवड शहरातील काँग्रेसचे अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख यांनी प्रभाग कार्यालयात आयोजित जनसंवाद सभेमध्ये संबंधित अधिकाऱ्यांना गडूळ पाण्याची बाटली देऊन शहरात त्वरित स्वच्छ निरोगी पाणी नागरिकांसाठी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली.
मागील काही दिवसापूर्वी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सचिन साठे यांनीही ड प्रभाग कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना गडूळ पाणीपुरवठा होत असल्याबाबत निदर्शनास आणून दिले होते व संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच फैला वर घेतले होते, त्यावर आपण त्वरित कारवाई करू असेही संबंधित अधिकाऱ्यांनी आश्वासित केले होते. परंतु मागील आठ दिवसापासून आणखीनच गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने काँग्रेसचे अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख यांनी स्वच्छ निरोगी पाण्याची मागणी त्वरित पूर्ण करावी, अशी मागणी केली आहे.