शबनम न्युज | पुणे
पुण्यातील अग्रगण्य संस्था सह्याद्री ऑफ रोड या संस्थेतर्फे दिनांक ९ व १० जुलै रोजी पुण्यातील वाघोली येथे स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सौभाग्यवती सुमित्राताई अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर स्पर्धा कोल्हापूर, सातारा, मुंबई, सिलवासा येथेही आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये जीप गाडीतून डोंगर, दरी, पाणी अशा कठीण भागातून डोंगरदऱ्यातून गाडी चालविली जाते. या स्पर्धेमध्ये एकूण ४० स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत पुण्यातील दौलत चौधरी यांनी पहिले क्रमांक पटकावले. तर त्यांचाच मुलगा गौरव चौधरी यांनी तिसरे क्रमांक पटकावले. या दोन्ही पिता- पुत्रांचा सन्मान त्यांना प्रथम व तिसरे क्रमांकाचे बक्षीस देऊन करण्यात आले. सर्वात मोठी कौतुकाची गोष्ट म्हणजे या पिता-पुत्रांनी या स्पर्धेसाठी अटल मेहनत घेतली व स्पर्धा आपल्या नावावर करून घेतली. त्यांच्या या जिद्दीच्या जोरावर त्यांनी मिळवले यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.