राष्ट्रवादीच्या मा. नगरसेविका स्वाती माई काटे, व शेखर भाऊ काटे युवा मंच यांच्या वतीने शिबिराचे आयोजन
शबनम न्युज | पिंपरी
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचा वाढदिवस राष्ट्रवादी पक्षाचे नेते, कार्यकर्ते यांच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक उपक्रम राबवून उत्साहाने साजरा होत असताना, पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका स्वाती माई काटे, व शेखर भाऊ काटे युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. दापोडी परिसरातील रहिवासी नागरिकांसाठी सदरचे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरात असंख्य पुरुष महिला व बालकांनी सहभाग घेऊन या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.
अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या आरोग्य शिबिरामध्ये मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर फुगेवाडी या ठिकाणी, तसेच मारुती मंदिर गावठाण, दापोडी, या ठिकाणी करण्यात आले. या नेत्र शिबिराचा लाभ दापोडी,फुगेवाडीतील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात घेतला. राष्ट्रवादीचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामध्ये असंख्य नागरिकांनी सहभाग घेतल्याने माजी नगरसेविका स्वाती माई काटे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.