दोन दिवसात वेबसाईटवर मतदार याद्या उपलब्ध करण्यात प्रशासन अपयशी, निवडणूक आयोगाकडे केली तक्रार
पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक विभागाला 21 जुलै 2022 ही अंतिम मतदार यादी प्रसिद्धीची मुदत होती. परंतु पुन्हा महानगरपालिका निवडणूक विभागाचा भोंगळ कारभार उघड झाला असून वेबसाईटवर मतदार याद्याच उपलब्ध करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे, असा आरोप भाजपचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी केला आहे.
या संदर्भात विलास मडिगेरी यांनी आज 22/7 रोजी मेलव्दारे भारत निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग, पुणे विभागीय आयुक्त, पुणे जिल्हाधिकरी आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यांच्याकडे तक्रार नोंदवली आहे. त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतिम मतदार यादी पब्लिश करण्याच्या दिनांक 21/07/2022 महानगरपलिका वेबसाइट वर दिसणे नियमानुसार आवश्यक होते असे असताना आज शुक्रवार दिनांक : 22/07/2022 सायंकाळी 6.40 वाजे पर्यंत प्रारूप मतदार उपलब्ध होती पण अजिबात ओपन होत नव्हती आणि 8.05 वाजता प्रभागवाइज अंतिम मतदार नावांची यादी फक्त दिसत होती पण तेही अजिबात ओपन होत नव्हती
24 तास झाल्यानंतरही महानगरपलिका वेबसाइट वर किंवा राज्य निवडणूक आयोगाचा वेबसाइटवर पब्लिश झाले नाही तसे साईट वर आत्ता पर्यंत दिसून येत नाही आम्ही दिवसभर खूप वेळा महानगरपलिका वेबसाइट उघडून पहिली तर ओपन होत नाही सदर विषय गंभीर असल्याचे या तक्रारी दखल करून घ्यावी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाच्या नियमांचा भंग झाला आहे हे स्पस्ठ्ठ दिसून येत आहे. म्हणून आम्ही मुदतवाढ दया म्हणून मागणी द्वारे मागितली होती या माझ्या गंभीर तक्रारी कडे सर्वानी कानाडोळा करून दुर्लक्ष केले आहे. आज मतदार जाहीर करण्याच्या 24 तासानंतरही मतदार यादी जाहीर झाले नाही. हे अत्यंत चुकीचे आहे.
मतदार यद्यांचा संपूर्ण शहरामध्ये प्रचंड गोंधळ आहे आणि लाखों मतदारांचे नावे सेक्शन हेडच्च्या अटी मुळे या संदर्भातील तक्रारी आहेत यासाठी निष्पक्ष मतदार यादी तयार व्हावी तसेच ज्या ठिकाणी जो मतदार राहतो आहे त्याचे कडे राहत्या पत्यावर अनेकवर्षापासून पुरावा आहे ज्या हरकती सदर आहेत त्याला राहत असलेल्या प्रभागातील उमेदवाराला मतदान करण्याच्या हक्कापासून वंचित करण्यात येत आहे तसेच स्थानिक ज्या त्या प्रभगातील उमेदवाराला मतदान घेण्यापासूनही मनाई होत आहे. म्हणून 2 आठवडे मुदातवाडीची मागणी आम्ही सर्वाना केली होती. राज्य निवडणूक आयोग जाणून बुजून दुर्लक्ष केले आहे.
आणि महानगरपालिका आयुक्त मा राजेश पाटील. अतिरिक्त आयुक्त-2 श्री जितेंद्र वाघ, निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त मा बाळासाहेब खांडेकर लेखी पत्र देवून फोन करून प्रत्यक्ष भेटून विनंती केली तरी या सर्वानी माझ्या या गंभीर विषय लक्ष्य देवून मुदतवाढ मागणिकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले आहे. माझ्या प्रभागतील 6,755 मतदारांचे हरकती मुदतीत 3/07/2022 रोजी दाखल केली होती महानगरपालिका मिळकतकर बिल कॉपी 7105 एकूण पानंक व 3,550 पेज झेरॉक्स हरकती बरोबर जोडली होती.
आज शुक्रवार दिनांक 22/07/2022 रोजी सायंकाळी 7.07 पर्यंत महानगरपालिका व राज्य निवडणूक आयोग या दोघांच्या वेबसईटवरून दिसून येत नाही प्रशासनाच भोंगळा कारभार यातून दिसून येत आहे. आयोगाच्या नियमांचा भंग झालेला आहे तसेच आम्ही दिलेल्या हरकती प्रमाणे नावे योग्य त्या वारडात बदल नाही झाल्यास
या विरोधात मुंबई उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात मतदार यादीवर वेगळी याचिका दाखल करावी लागेल, असे मडिगेरी यांनी म्हटले आहे.