जास्तीत-जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे मा. नगरसेवक कुंदन गायकवाड यांची आवाहन
शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत थेरपी सेवा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. २६ जुलै ते २ आॅगस्ट २०२२ या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत श्री गणेश मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, चिखली येथे हा उपक्रम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती मा. नगरसेवक कुंदन गायकवाड यांनी दिली आहे.
तसेच या सप्ताहात मधुमेह, अर्धांगवायू, थायरॉईड, संधिवात, मानदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी, पायदुखी, किडनी, यकृताचे विकार, ह्रदयविकार, उच्च रक्तदाब, पित्त, अपचन आदी आजारांवर निसर्गाेपचार आणि अॅक्युप्रेशर थेरपीच्या मदतीने मोफत उपचार करण्यात येणार आहेत. नागरिकांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन कुंदन गायकवाड यांनी केले आहे.