शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरात प्रवेश करणाऱ्या मुख्य मार्गावर (RCC) स्वागत कमान उभारणे याबाबत प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांना ऑल इंडिया मजलीस ए इतहाद्दूल मुस्लिमिन एम आय एम पक्ष शहराध्यक्ष धम्मराज साळवे यांनी निवेदन दिले.
दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, पिंपरी चिंचवड शहर हे देशात व राज्यात स्मार्ट सिटी म्हणून ओळखली जाते. आपल्या पिंपरी चिंचवड शहरात शहराचे नावलौकिक व शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या देश व जगभरातल्या नामांकित कंपन्या तसेच प्रशस्त रस्ते, मेट्रो, भव्य उद्याने, सांस्कृतिक सभागृह, सायन्स पार्क, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकर भीमसृष्टी, छत्रपती शिवाजी महाराज शिवसृष्टी, शक्ती भक्ती स्मारक, महात्मा फुले, शाहू महाराज अश्या सर्व महापुरुषांची भव्य दिव्य स्मारक आहेत. यामुळे शहराची देशभरात व जगभरात खूप चांगली अशी ओळख निर्माण झाली आहे. यामुळे शहराला भेट देण्यासाठी मोठ्या प्रमाणात अनेक मान्यवर, नागरिक येत असतात. यामुळे शहराच्या सौंदर्यात आणखी भर घालण्यासाठी शहरात प्रवेश करणाऱ्या दापोडी, निगडी, तसेच मुख्य मार्गावर भव्य व आकर्षक अश्या (RCC) स्वागत कमान उभारण्यात याव्यात, असेही सदर निवेदनात धम्मराज साळवे यांनी नमूद केले आहे.