शबनम न्युज | मुंबई
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या आणि प्रसिद्ध वक्त्या सुषमा अंधारे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत गुरुवारी शिवसेनेत प्रवेश केला. सुषमा अंधारे यांच्या माध्यमातून शिवसेनेला आंबेडकरी चळवळीतला नवा चेहरा मिळाला आहे. यावेळी, शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी त्यांच्या हातावर शिवबंधन बांधले. त्यांच्यासोबत आणखी काही महिला कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर उपनेतेपदाची जबाबदारी सोपविली. सुषमा अंधारे यांच्यामुळे पुण्यात शिवसेनेला मिळणार आक्रमक चेहरा मिळणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. दरम्यान, सुषमा अंधारे या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत्या. काही दिवसापूर्वी सुषमा अंधारे यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांची भेट घेतली होती. यानंतर आज सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.