प्रतिनिधी | दिलीप सोनकांबळे
“स्थानिक पोलिसांच्या संमतीने ताबा घेण्याचे काम सुरू असल्याचा शेतकऱ्यांच्या आरोप”
शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
नियंत्रण कक्षाला माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शेत जमिनीचा बेकायदशीर ताबा घेणाऱ्या ५१ जणांना अटक केली. ही घटना स्थानिक पोलिसांच्या संमतीने ताबा घेण्याचे काम सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पोलिस आयुक्त “अंकुश शिंदे” यांनी दिले आहेत. तसेच, यामध्ये दोषी आढळणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यामुळे देहूरोड जमीन ताबाप्रकरण कोणावर तरी शेकण्याची शक्यता आहे.
अशोक शंकर चव्हाण (७०, रा. देहूगाव ) यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अनिल मारुती घोगरे, आकाश अनिल घोगरे यांच्यासह अन्य ५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील ५१ जणांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की बुधवारी सकाळी आरोपी अनिल घोगरे, आकाश घोगरे यांनी आपसात संगनमत करून पन्नास गुंडांच्या मदतीने फिर्यादी यांच्या शेतजमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, फिर्यादी आणि त्यांच्या भावाने व्यक्त केले जात आहे. हरकत घेतली असता आरोपींनी त्यांना शिवीगाळ केली. तसेच, आरोपी अनिल याने फिर्यादी यांना तुम्ही आम्हाला ओळखले नाही, आम्ही तार कुंपण करणारच, तुम्ही पुढे याला तर मर्डर करेन’, अशी धमकी दिली.
दरम्यान, फिर्यादी यांनी पोलिस नियंत्रण कक्षाला कॉल केला. त्यानंतर, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनेची गंभीर दखल घेऊन घटनास्थळी अतिरिक्त आर्थिक डील केल्याचे सांगितले. फौजफाटा पाठवला. त्यावेळी घटनास्थळी शेकडो तरुण उपस्थित असल्याचे दिसून आले. पोलिसांनी बळाचा वापर करून सर्वांना ताब्यात घेतले. त्यानंतर, सर्वांची चौकशी केली असता अनेकांना हा बेकायदेशीर ताबा असल्याचे माहितीच नसल्याचे समोर आले. त्यानंतर, एकूण ५२ जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करीत ५१ जणांना अटक केली आहे. दरम्यान, देहूरोड पोलिसांच्या संमतीनेच हा ताबा घेण्याचे काम सुरू असल्याचा आरोप फिर्यादी यांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. फिर्यादी यांनी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांची भेट घेऊन सदर प्रकरणात स्थानिक पोलिसांशी आरोपींनी मोठी
त्यानुसार, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशी सुरू केली. या प्रकरणात स्थानिक पोलिसांवर केलेल्या आरोपांची सर्व बाजूने चौकशी करण्यात येणार असून, दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.