शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
आगामी पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक शाखेने प्रसिद्ध केलेल्या ओबीसी सर्वसाधारण जागांचे आरक्षण सोडतीचे प्रारूप शनिवारी होणार आहे. त्यावर नागरिकांना दोन ऑगस्टपर्यंत सोडतीवर हरकती नोंदविता येणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार, ओबीसी आणि सर्वसाधारण महिलांसाठीच्या आरक्षित जागांसाठी चिंचवड मध्ये सोडत काढली. त्यामुळे निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. सोडती वर इच्छुक नागरिकांना हरकती व सूचना घेण्याची संधी आहे. शनिवारी प्रभाग निहाय आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
३० जुलै ते २ ऑगस्टपर्यंत प्रभाग निहाय आरक्षण निश्चिती वर हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत. ज्यांच्या कोणाच्या हरकती व सूचना असतील त्यांना महापालिका आयुक्त निवडणूक विभागात अथवा संबंधित प्रभाग कार्यालयात लेखी स्वरूपात हरकत्व सूचना द्यावी लागतील. आरक्षण निश्चिती वर प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर विचार करून पाच ऑगस्टला प्रभाग निहाय अंतिम आरक्षण शासन राजपत्रात प्रसिद्ध केले जाणार आहे. प्रारूप यादी शनिवारी प्रसिद्ध होणार आहे. ती प्रभाग कार्यालयात पाहण्यास मिळणार आहे.