शबनम न्यूज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादीचे युवा नेते राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष निहाल भाई पानसरे यांचा वाढदिवस त्यांच्या वाढदिवसानिमित्त स्व.फकीर भाई पानसरे एज्युकेशन फाउंडेशन संचलित लोकमान्य होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज चिंचवड यांच्या वतीने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरामध्ये होमिओपॅथिक उपचार व औषधे मोफत दंतचिकित्सा आणि मोफत रूट कॅनल तज्ञ डॉ. सुज्ञा घाणेकर यांच्या सहकार्याने केले गेले तर या आरोग्य शिबिरात मोफत डोळे तपासणी व गरजूंना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. हे चष्मेवाटप युवा नेते पानसरे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या शिबिरात सहभागी झालेल्या नागरिकांना त्यांच्या रक्तातील साखर तपासणी व सांधेदुखीवर मोफत फिजिओथेरपी उपचारही करण्यात आले. हा कार्यक्रम सोमवार दिनांक १ ऑगस्ट रोजी चिंचवड स्टेशन येथील साईबाबा नगर येथे तसेच इंदिरानगर व लोकमान्य होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज या तीन ठिकाणी करण्यात आला व या तिन्ही ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी पहावयास मिळाली. या आरोग्य शिबिराचा अनेक नागरिकांनी लाभ घेतला.
युवा नेते निहाल भाई पानसरे हे पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे यांचे सुपुत्र. आझमभाई पानसरे यांच्यासारखे सामाजिक काम करण्यात निहालभाई पानसरे नेहमी अग्रेसर असतात. त्यांच्या या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवून अनेक नागरिकांना या उपक्रमांचा लाभ घेता यावा, यासाठी सदरचे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले. सदर आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी लोकमान्य होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे सर्व वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नर्स व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.