सामाजिक उपक्रमांना नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद
शबनम न्यूज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष युवा नेते अतिश बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड शहरात विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने अतिश बारणे यांचे जनसंपर्क कार्यालय येथे भव्य आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले.
युवा नेते आतिश बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या सामाजिक उपक्रमाचे उद्घाटन भोसरी विधानसभा मतदारसंघाचे प्रथम आमदार विलास लांडे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांच्यासोबत पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी नगरसेवक वसंत बोराटे, महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट, नगरसेवक विक्रांत लांडे, रवि लांडगे
धनंजय आल्हाट, मंदालाई आल्हाट, उत्तम आल्हाट नितिनदादा सस्ते, आकाश कंद, सुप्रिया सोळकुटे, सुनिता लांडे, आप्पा बालघरे, दत्ता जगताप, प्रविण राजपुरोहित, पंडित गायकवाड, नवनाथ बरिण, दिपक बारणे, योगेश बारण, आदिनाथ बारणे मान्यवर उपस्थित होते.
या आरोग्य शिबिरात मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, मधुमेह व हृदयरोग तपासणी, आहार व जीवनशैली मार्गदर्शन, रक्तदान शिबिर व रक्तदात्यास पेन ड्राईव्ह व दहा लाखाच्या विमा पॉलिसीचे वाटप यावेळी करण्यात आले.
तसेच या वाढदिवसाच्या निमित्ताने हभप गणेश महाराज शिंदे यांचे कीर्तन व मोशी पंचक्रोशीतील कीर्तनकारांचा सन्मान यावेळी करण्यात आला.
तसेच युवा नेते अतिश बारणे यांच्या या वाढदिवसानिमित्त बांधकाम कामगारांसाठी सुरक्षा किट वाटप करण्यात आली. तसेच ज्येष्ठ नागरिकांना छत्री व ट्रॅफिक पोलिसांना रेनकोट वाटप करण्यात आले. तसेच दिव्यांग बांधवांना सायकल वाटप करण्यात आली तर भाजीपाला विक्रेते व चप्पल दुरुस्ती करणाऱ्या बांधवांना पावसाळा व उन्हाळ्यात उपयोगी येणारी मोठी छत्री वाटप करण्यात आली.
तसेच मंगळवारी वाढदिवसाच्या दिवशी वाघेश्ववर मंदिर, बोऱ्हाडे वाडी मोशी येथे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तसेच प्रीती इंग्लिश मीडियम स्कूल, गायकवाड वस्ती मोशी येथे महिलांसाठी हाडांची तपासणी तसेच ब्रेस्ट कॅन्सर तपासणीचे आयोजन करण्यात आले. या सर्व उपक्रमांचा परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.
चांडाळ चौकटीच्या करामती हा मनोरंजनात्मक कार्यक्रम
युवा नेते अतिश बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त मोशी, चिखली परिसरातील तसेच प्रभागातील नागरिकांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम ‘चांडाळ चौकडीच्या करामती’ हा मंगळवार दिनांक २ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आला. यामध्ये कलाकारां वतीनेअनेक विनोदी कार्यक्रम आयोजित करून उपस्थित नागरिकांचे मनोरंजन होणार आहे.
युवा नेते अतिश बारणे यांच्या या वाढदिवसानिमित्त आयुष्यमान भारत कार्ड नागरिकांना वाटप करण्यात आले असून परिसरातील विशिष्ट नागरिकांचा सत्कार व गुणगौरव सोहळा ही या निमित्ताने आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचे अतिश बारणे यांनी आभार व्यक्त केले.