शबनम न्यूज | मुंबई
शिवसेना नेते संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. ईडीने संजय राऊत यांची न्यायालयाकडे ८ दिवसांच्या कोठडीची मागणी केली. मात्र संजय राऊत यांच्या वकिलांनी कोठडी द्यायची असेल तर आठ दिवसांपेक्षा कमी द्यावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने संजय राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.
मुंबईतील १ हजार ०३४ कोटींच्या पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या घराची झाडाझडती घेतल्यानंतर सुरुवातीला ताब्यात घेऊन रविवारी रात्री उशीरा ईडीने त्यांना अटक केली. त्यांनतर सोमवार (दि.०१ ) रोजी त्यांना सत्र न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाकडे ८ दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती परंतु न्यायालयाने संजय राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.
यांनतर संजय राऊत यांचे लहान बंधू सुनील राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले कि, “न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. ईडीने त्यांच्याकडे आठ दिवसांची कोठडी मागितली. मात्र, न्यायालयाने केवळ तीन दिवसांची कोठडी दिली.” “४ ऑगस्टला त्यांना परत न्यायालयासमोर हजर करतील,” असं सुनिल राऊत यांनी सांगितलं.
Mumbai | Court sends Sanjay Raut to ED custody till August 4th in connection with Patra Chawl case.
(File photo) pic.twitter.com/nYxihBTdWi
Advertisement— ANI (@ANI) August 1, 2022