शबनम न्यूज | पिंपरी
पिंपरी-चिंचवड शहरातील कैंब्रिज इंटरनेशनल स्कूलचे संचालक धनंजय वर्णेकर यांना क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले व माई सावित्रीबाई फुले यांच्या नावाच्या फुले दांपत्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यानंतर धनंजय वर्णेकर यांनी दिली आपली प्रतिक्रिया देताना सांगितले कि, आपण ज्यांची इच्छा करतो प्रत्येक वेळी तेच आपल्याला मिळेल असे नाही, परंतु न कळत बऱ्याच वेळा आपल्याला असे काहीतरी मिळते ज्याची कधीच अपेक्षा नसते. याला आपण केलेल्या चांगल्या कामाबद्दल मिळालेले आशीर्वाद असे म्हणतो. चांगल्या कर्माचे चांगले फळ मिळते. आम्हा उभयतांना मिळालेला फुले दांपत्य पुरस्कार हा आज पर्यंत आम्ही प्रामाणिकपणे केलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचे फळ आहे देहा पासून देवा पर्यंत पोहोचताना मध्ये देश लागतो आणि या देशाचे आणि समाजाचे देणे लागतो हे मानुन अखंड कार्य करत राहिलो आणि आज भारताचे शिक्षण पिता व महिला साठी शिक्षणाचे द्वार उघडी करून देणारी व क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले व माई सावित्रीबाई फुले यांच्या नावाचा फुले दांपत्य या पुरस्काराने जे सन्मानित करण्यात आले हे आम्ही आमचे परम भाग्य समजतो.
सोमवारी (दि. ०८ ) रोजी रामकृष्ण मोरे सभागृह चिंचवड येथे सदर सोहळा संपन्न झाला. महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळाचे आयुक्त श्री रविराज इळले, सावता परीषद चे अध्यक्ष श्री कल्याण आखाडे , माजी महापौर राहुलदादा जाधव, अपऺना डोके आनिता फरांदे,मा.वसत नाना लोढे,सौ.कवीताताई आल्हाट,मा.नगरसेविका सगिता ताई ताम्हाणे, मंडळाचे अध्यक्ष श्री हनुमंत माळी व सहकारी उपस्थित होते.
क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले व माई सावित्रीबाई फुले हे दांपत्य खऱ्या अर्थाने याचे कार्य महान आहे व सऺत सावता माळी हे वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ सत आसुन याचे आचार विचार आपण आवलऺब केला पाहिजे असे श्री कल्याण आखाडे यांनी सांगितले तर समाजातील सर्व घटकांना समवेत घेऊनच समाजाची प्रगती केली पाहिजे असे उल्लेख मा. आयुक्त इळले यांनी केला. फुले दांपत्य पुरस्कार नंतर श्री धनंजय वणेऀकर यांनी हा पुरस्कार आपल्या सस्थेतील कर्मचारी व आतापर्यंत च्या प्रवासात ज्यानी साथ दिली त्या सर्वांना सर्मपित करत आहोत, असे सांगितले.