शबनम न्यूज | पिंपरी
महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार व युवा नेते अतिश बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त सक्षम सोशल फाउंडेशन व अतिश बारणे युवा मंच तर्फे विविध समाज उपयोगी उपक्रम घेण्यात आले. महादेव मंदिर, बारणेवस्ती, मोशी येथे कीर्तनाचा कार्यक्रम घेण्यात आला. तसेच महादेव मंदिर भजनी मंडळ, बारणेवस्ती, मोशी यांना मृदुंग, स्वर पेटी, वीणा,टाळ साहित्याचे वाटप करण्यात आले.
वाघेश्वर मंदिर बोऱ्हाडेवाडी व संजयगांधी नगर व बारणेवस्ती मोशी येथे वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी मा.नगरसेवक धनंजय आल्हाट,संभाजी बोऱ्हाडे, भानुदास बोऱ्हाडे, काळूराम बोऱ्हाडे, शांताराम बोऱ्हाडे,सुरेश बोऱ्हाडे, अजिंक्य बोऱ्हाडे, प्रकाश गव्हाणे,योगेश बारणे,दिपक बारणे, गोरक्षनाथ बारणे,शुभम आल्हाट, अक्षय बोऱ्हाडे,सतिश कदम, सचिन बोऱ्हाडे,आकाश बोऱ्हाडे, वैभव बोऱ्हाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया, रक्तदान शिबीर, मधुमेह व हृदय विकार, मोफत आहार व जीवनशैली मार्गदर्शन, बांधकाम कामगारांना सुरक्षा कीट वाटप, जेष्ठ नागरिकांना छत्री वाटप, ट्राफिक पोलिसांना रेनकोट वाटप, महिलांसाठी मोफत हाडांची तपासणी, घरकाम महिलांना सन्मान भेट, सफाई कर्मचार्यांना रेनकोट वाटप, भाजी विक्रेत्यांना मोठी छत्री वाटप, तसेच नागेश्वर विध्यालायातील मुलींचे हिमोग्लोबीन चेकअप व तज्ञ डॉ.प्रगती चौघुले यांनी मुलींना मार्गदर्शन केले. यावेळी विद्यालयाचे प्रा.दिलीप इचके सर, भारती फुगे मॅडम, सदाकाळ सर, योगेश बारणे,दिपक बारणे, आदिनाथ बारणे,अक्षय बोऱ्हाडे,सतिश कदम, सचिन बोऱ्हाडे, आकाश बोऱ्हाडे, वैभव बोऱ्हाडे इ. मान्यवर उपस्थित होते.
प्रिती इंग्लिश मिडीयम स्कुल गायकवाडवस्ती येथे तज्ञ डॉ.प्रगती चौघुले यांच्या मार्गदर्शनासाठी महिलांसाठी ब्रेस्ट कॅन्सर व हाडांची तपासणी करण्यात आली. यावेळी सौ.प्रिती मिसाळ मॅडम, प्रतिक मिसाळ, विध्यार्थी व शिक्षकवृंद आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच मोशी मधील १०वी व १२वी गुणवंत विध्यार्थांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मा.शहर अध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक विक्रांत लांडे, नगरसेवक मयूर कलाटे, नितीन सस्ते, संभाजी बोऱ्हाडे, हवेली बँक चेअरमन संजयशेठ बोराटे, रमेशशेठ गायकवाड, पिंटू नाना बोराटे, सखाराम बोऱ्हाडे, अक्षय आल्हाट, अमित इंगळे, प्रकाश बनकर, परमेश्वर आल्हाट, संदिप आल्हाट, ह.भ.प. दशरततात्या बोराटे, अभिराज अजितभाऊ गव्हाणे इ. मान्यवर उपस्थित होते.तसेच शिव मंदिर भजनी मंडळ, बारणेवस्ती, मोशी यांना मृदुंग, स्वर पेटी, वीणा,टाळ साहित्याचे वाटप करण्यात आले.
विभागातील जनतेच्या मनोरंजनासाठी चांडाळ चौकडीच्या करामती या विनोदी कार्यक्रमाचे
आयोजन करण्यात आले होते. यावेळी भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार मा.श्री.विलासशेठ लांडे पाटील, रा.कॉं.पि.चि. शहर अध्यक्ष अजित गव्हाणे,कामगार नेते इरफान सय्यद, संजय वाबळे, खासदार डॉ. अमोल कोल्हे साहेब यांचे सुय्य सहाय्यक तेजस झोडगे, मा.नगरसेवक वसंतशेठ बोराटे,टाटा युनियन लीडर अध्यक्ष सचिनभैया लांडगे, रा.कॉं.पि.चि.महिला शहर अध्यक्ष कविताताई आल्हाट, मा. शिक्षण समिती सभापती धनंजय भालेकर, मा.नगरसेवक प्रविण भालेकर, कृषी उत्पन्न बाजार समिती मा.सभपती विलासशेठ कातोरे,,मा. नगरसेवक आप्पा बागल, युवा नेते यश दत्ताकाका साने आदी उपस्थित होते.