शबनम न्युज | मुंबई
शिवसेना खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. मागील सुनावणीत न्यायालयाने राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत सुनावणी दिली होती.त्यानंतर आज त्यांना पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी सेशन कोर्टाने पुन्हा एकदा ईडी कोठडी सुनावली आहे.
न्यायालयाच्या निर्णयामुळे राऊत यांचा कोठडीतील मुक्काम आणखी काही काळ वाढला आहे. आम्हाला आणखी काही महत्त्वाची कागदपत्रे तपासायची आहेत. जे अलिबागमधील जमिन व्यवहाराशी संबंधित आहेत, असा दावा ईडीने न्यायालयात केला होता. तसेच, 10 ऑगस्टपर्यंत राऊत यांची कोठडी देण्यात यावी, अशी मागणी ईडीने केली होती. मात्र, न्यायालयाने 8 ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी सुनावली.
Advertisement