शबनम न्युज | पिंपरी
मनपा उद्यानासाठी आरक्षित असलेल्या जागेवर अनधिकृत बांधलेल्या मंगल कार्यालयावर अतिक्रमण करवाई करा, अशी मागणी विठ्ठल प्रतिष्ठान चे संस्थापक/अध्यक्ष निखिल दळवी यांनी पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, प्रभाग क्रमांक १४ आकुर्डी मधील खंडोबा मंदिरा शेजारी (गाव आकुर्डी सर्वे नंबर ६१/१अ )या मनपा उद्याना साठी आरक्षित असलेल्या जागे मधे मोठे अनाधिकृत मंगल कार्यालय बांधले आहे. या करिता मनपा ची कोणतीही परवानगी घेतलेली नाही. सदर मंगल कार्यालय हे अनधिकृत आहे. या मंगल कार्यालयाच्या पार्किंगसाठी मनपा ची आरक्षित जागा कित्येक वर्ष झाले मोफत वापरली जात आहे. मनपा ची फसुवणुक केली जात आहे. मनपाला भाड़या रूपी मिळणार महसुल बुड़त आहे. मनपा आरक्षित जागेचा मोफत वापर मंगल कार्यालय व पार्किंग साठी मोफत वापर होत आहे. या कड़े मनपा चे लक्ष नाही. आमच्या माहिती नुसार, ज्या जागेत मंगल कार्यालय बांधले आहे. ती जागा ही पिंपरी चिंचवड़ मनपा च्या मालकीची आहे. सदर जागेची कागत पत्रे तपासुन जागा कोणाची आहे हे देखील मनपा ने पडतालुन घ्यावे, व जागेची मोजनी करून मनपा ची असलेली जागा ताब्यात घेऊन कम्पाउंड वॉल (सिमा रेशा भिंत बांधून) जागेला गेट लाउन गेटला कुलुप ( लॉक) लाऊन जागेचा ताबा मनपा कड़े ठेवावा व सदर जागेवर मनपा ने वॉचमेन ठेवावा जेने करून कोणी मनपाच्या मालकीच्या जागेचा विणा परवानगी घेता वापर करणार नाही. सदर जागे वर उद्यान तयार करण्याचे आरक्षण आहे. मनपा ने या जागेवर लवकरात लवकर उद्यान विकसित करावे, मोफत होत असलेला जागेचा वापर थांबवावा, तरी या सर्व बाबी लक्षात घेता मनपा आरक्षित जागे वर बांधले असलेल्या अनाधिकृत मंगल कार्यालया वर लवकरात लवकर अतिक्रमण करवाई करावी, असेही सदर निवेदनात निखिल दळवी यांनी नमूद केले आहे.