शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
10 ऑगस्ट रोजी एक दिवसीय लाक्षणिक संप टपाल खात्यातील कर्मचारी करणार असून याबाबतची नोटीस टपाल खात्याला देण्यात आलेली आहे ही नोटीस टपाल खात्यातील दोन मान्यता प्राप्त संघटना एन एफ पी इ व एफ एन पी ओ यांच्या संयुक्त कृती समितीने बजावण्यात आली आहे. गेल्या काही वर्षात सर्व केंद्र सरकार खात्यांचे खाजगीकरण होताना आपण पाहत आहोत.
सध्या टपाल खात्याचे खाजगीकरण करण्याचा घाट सरकारने घातलेला आहे. टपाल खात्यातील या दोन्ही संघटनांनी वेळोवेळी या खाजगीकरणाला विरोध करून आतापर्यंत हे खाजगीकरण टाळण्याचा प्रयत्न केला आहे. पोस्ट खात्याचे स्थापनेपासून पीओएसबी ही बँक ग्राहकांच्या विश्वासाला पात्र ठरलेली एकमेव सरकारी बँक आहे आणि याच सरकारी बँकेचे खाजगीकरण करण्याच्या बाबतचे षडयंत्र सरकारने रचलेले आहे.
त्याचबरोबर टपाल खात्यातील कर्मचाऱ्यांच्या इतरही मागण्या प्रलंबित आहेत वेळोवेळी आंदोलने धरणे, संप करूनही सरकार याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करत आहेत . 10 ऑगस्ट रोजी असलेल्या संपातील प्रमुख मागण्या –
डाक मित्र योजना व कॉमन सर्विस सेंटर च्या माध्यमातून टपाल खात्याचे खाजगीकरणाचे धोरण थांबवा ,व तसेच बचत बँक योजना पीओएसबी चे आयपीपीबी मध्ये विलीन करण करण्याचा प्रस्ताव रद्द करा. नवीन पेन्शन योजना रद्द करा व सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पारंपारिक पेन्शन योजना लागू करा ,एन एस पी 1व एन एस पी 2 कनेक्टिव्हिटी चे नियम व जलद स्पीड वाढविणे पिनॅकल सर्वरची कार्यक्षमता वाढविणे व एस ए पी विनाअडचण नियमित कार्यरत राहावे यासाठी त्वरित उपाययोजना करणे नोडल डिलिव्हरी सेंटर बंद करा, ग्रामीण डाक सेवा कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या ,व त्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करा ,टपाल खात्यातील सर्व रिक्त जागा त्वरित भरा ,जीडीएस कर्मचाऱ्यांना कमलेश चंद्र कमिटीच्या शिफारशीनुसार त्वरित लागू करा., कोविड मुळे मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांचे कुटुंबाला दहा लाख रुपये भरपाई देणे व एका वारसाला अनुकंपा धरतीवर खात्यात नोकरी देणे व कोविड संदर्भातील विषयाची त्वरित अंमलबजावणी करा ,कोविड काळात 18 महिन्यांसाठी गोठविलेल्या थकीत महागाई भत्त्याने भूकतान करा व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाही त्याचा लाभ लागू करा, अवास्तव व असंभव बिजनेस टार्गेट सततचे महालोगिन डे तसेच रविवार व सुट्टीच्या दिवशी कॅम्प मेळाव्यासाठी कामावर येण्याची शक्ती या माध्यमातून कामगारांची होणारी पिळवणूक व ससेहोलपट थांबवा टपाल व आर एम एस विभागात पाच दिवसाचा आठवडा लागू करा. पोस्टल अकाउंटच्या रिक्त जागा त्वरित भरा, सर्व स्तरावर युनियन मीटिंग नियमित करा , टपाल खात्यातील एचएसजी 1 व एच एस जी 2 सहित सर्व रिक्त जागा त्वरित भरा तसेच भरतीसाठी स्टॉक सिलेक्शन कमिशन ऐवजी खातेनिहाय भरती प्रक्रिया चालू करा तसेच Contributory negligenceच्या नावाखाली एस बी सी ओ कर्मचाऱ्यांची होणारी पिळवणूक थांबवा., अर्धवेळ पूर्णवेळ कॅज्युल लेबर ला वेळेवर भुक्तान करा व ज्यांना एमटीएस जीडीएसच्या रिक्त जागी सामावून घ्या या प्रमुख पाहुण्यांसाठी हा 10 ऑगस्ट रोजी चा संप आहे.