शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरातील मा.स्विकृत नगरसेवक संदीप गाडे व संदीप गाडे मित्र परिवार यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रोटरी क्लबच्या शाखेचे उदघाटन थेरगाव येथे करण्यात आले.
या क्लबचा अनावरण समारंभ थेरगाव येथे पंचतारांकित हॉटेल मध्ये संपन्न झाला . यावेळी थेरगाव रोटरी क्लबच्या चार्टर्ड प्रेसिडेंट म्हणून संदीप गाडे यांची निवड करण्यात आली तर, सेक्रेटरी म्हणून सुनील जगताप यांची निवड करण्यात आली .
या क्लबच्या माध्यमातून सामाजिक दृष्ट्या महत्वाचे अनेक विषय हाताळले जाणार त्याद्वारे थेरगावच्या सामाजिक कार्यात क्लबच्या माध्यमातून भरीव काम घडणार आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी संदीप गाडे यांनी दिली.
या कार्यक्रम प्रसंगी डीजी अनिल परमार, पी. डी. जी मोहन पालीश्या ए.जी तारक रोटरी क्लब मगरपट्टा प्रेसिडेंट स्वामी चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, काळूराम बारणे, अनिल शितोळे, पंकजजी पटेल सदानंदजी नाईक,नितीन ढमाले आदी मान्यवर उपस्थित होते.