शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत प्रशासकीय कामकाज सुरू झाल्यापासून प्रभागातील विकासकामांना जनू ब्रेक लागला आहे. चालू स्थितीत असलेले जलनिस्सारण विभागातील कामे ठप्प झाले आहेत एवढेच काय मा.आयुक्त व अतिरिक्त आयुक्त यांना प्रभागातील ड्रेनेज विषयक समस्या संदर्भात दोनदा पत्र व्यवहार करून व निदर्शनास आणून पाच महिने उलटून देखील अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही संबंधित अधिकाऱ्याकडून तरतूद नसल्याचा मुद्दा उपस्थित करून वारंवार कामे टाळली जातात त्यातच मा.आयुक्त साहेब स्थायी सभेत फक्त नवनवीन विकास कामांना मंजूर देण्यात मश्गुल असल्याचे दिसून येते. गोरगरीब नागरिकांचे त्यांना काही देणे-घेणे नाही.नागरिकांच्या घरात मैलायुक्त ड्रेनेजचे पाणी येते त्याची दखल का घेतली जात नाही.? प्रशासनाने करदात्या नागरिकांना का वाऱ्यावर सोडले आहे.? महापालिका फक्त ठेकेदारांना पोसण्याचे काम करते का.? असा संतप्त सवाल दापोडीतील माजी नगरसेवक राजू बनसोडे यांच्यावतीने करण्यात आले.
झोपडपट्टी बहुल भाग असल्याने पावसाचा जोर वाढल्यास नागरिकांच्या घरात पाणी शिरते त्यावर लवकरात लवकर उपाययोजना करण्यात यावी लवकरात लवकर संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी नगरसेवक बनसोडे यांच्या वतीने देण्यात आला.