शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
“विभाजन विभिषिका स्मरण दिन” (Horrors of partition rememberance day) निमित्त महानगरपालिकेच्या वतीने प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे भारत देशाच्या फाळणी प्रसंगातील माहिती छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
भारत सरकार यांच्या निर्देशानुसार दि.१४ ऑगस्ट हा दिवस ” विभाजन विभिषिका स्मरण दिन ” म्हणून पाळण्यात येत आहे. या दिवसा निमित्त भारत देशाच्या फाळणी प्रसंगी घडलेल्या घटना, महासंहारमध्ये बळी पडलेल्या भारतीय नागरिकांच्या हालअपेष्टा, यातना याबाबतचे छायाचित्र प्रदर्शित केले आहेत. फाळणी संबंधीचे ५२ स्मृतीचित्रे माहितीसह प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले आहेत. प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलेल्या छायाचित्रांचा आकार ३ फूट बाय २ फूट असा आहे. या चित्र प्रदर्शनामध्ये तत्कालीन विविध वृत्तपत्रांमध्ये छापून आलेली कात्रणे आणि फोटो यांचे कोलाज पाहता येणार आहे. दि. २१ ऑगस्ट पर्यंत हे प्रदर्शन नागरिकांना पाहता येणार आहे.
चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथील पहिल्या मजल्यावरील आर्ट गॅलरी मध्ये हे प्रदर्शन आयोजित केले आहे. प्रदर्शन पाहण्यासाठी सर्वांना विनामूल्य प्रवेश देण्यात येत आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी केले आहे.