माजी नगरसेवक वसंत बोराटे यांचा सामाजिक उपक्रम
शबनम न्युज | पिंपरी
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त ‘हर घर तिरंगा’ ही संकल्पना केंद्र शासन व राज्य शासन यांच्या वतीने संपूर्ण देशात व राज्यात राबविली जात आहे. या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात मदत व्हावी, या हेतूने पिंपरी चिंचवड शहरातील माजी नगरसेवक वसंत बोराटे यांच्यावतीने ७५ हजार वह्यांचे वाटप होणार आहेत.
पिंपरी चिंचवड शहरातील श्री नागेश्वर विद्यालय मोशी, सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा मोशी, पिंपरी चिंचवड प्राथमिक शाळा बोऱ्हाडे वाडी, पिंपरी चिंचवड प्राथमिक शाळा जाधववाडी, अभिनव विद्यालय जाधववाडी या शैक्षणिक संस्थांमध्ये सदर ७५ हजार वह्यांचे वाटप विद्यार्थ्यांना केले जाणार आहेत, या उपक्रमाने अनेक विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येईल व त्यांना शैक्षणिक दृष्ट्या मोठा आधार मिळेल, या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध सामाजिक उपक्रम घेतले जात असताना, विद्यार्थ्यांनाही दिलाचा मिळावा व त्यांच्या शैक्षणिक प्रगतीत वाढ व्हावी, तसेच त्यांना छोटासा शैक्षणिक हातभार लावावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविला जात असल्याचे वसंत बोराटे यांनी स्पष्ट केले.१३ ऑगस्ट पासून सदर शाळांमध्ये वही वाटपाचा कार्यक्रम होणार आहे.