शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
भोसरीतील जुना प्रभाग क्रं.७ येथील माजी स्थायी समिती सभापती नगरसेवक अॅड. नितीन लांडगे, माजी स्थायी समिती सभापती नगरसेवक संतोष लोंढे, नगरसेविका सोनालीताई गव्हाणे,नगरसेविका भीमाताई फुगे यांनी संयुक्त विद्यमाने हर घर तिरंगा हि मोहीम घरोघरी पोहचावी व राष्ट्रभावना वाढीस लागावी या उद्देशाने तिरंगा रॅली चे आयोजन केले होते,या रॅलीला महात्मा फुले या विद्यालयातील १२०० विद्याथ्यांनी सहभाग नोंदवला असून पिंपरी चिंचवड मध्ये अतिभव्य अशी हि रॅली पार पडली.
भोसरीतील बापूजी बुवा चौक येथे माजी स्थायी समिती सभापती नितीन लांडगे,नगरसेविका सोनालीताई घव्हाने,नगरसेविका भीमाताई फुगे आणि मुख्याध्यापक निळकंठ लोंढे यांनी भारतमातेचे पूजन करून या रॅली ची सुरुवात केली.रॅली मध्ये ढोल ताशे वाजवणारे विद्यार्थी तसेच विविध वेशभूषा साकारलेले विद्यार्थी या रॅलीचे प्रमुख आकर्षण ठरले असून या परिसरात अॅड. नितीन लांडगे, नगरसेवक संतोष लोंढे, नगरसेविका सोनालीताई गव्हाणे,नगरसेविका भीमाताई फुगे यांनी गेल्या तीन दिवसांपासून घरोघरी तिरंगा वाटप केले होते,तसेच अन्य कोणी राहिले असतील तर त्यांच्यापर्यंत हो जनजागृती व्हावी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हार घर तिरंगा या अभियानाचो जी हाक दिलीये ती घरोघरी पोहचावी या उद्देशाने या तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
या रॅली मध्ये विद्यार्थी,नागरिक तसेच भोसरीकरांनी संख्येने सहभाग नोंदवला असून, हि रॅली बापूजी बुवा चौकातून,pmt चौकातून, छावा चौकातून आमदार महेशदादा लांडगे यांच्या निवासस्थाना मार्गे पुन्हा महात्मा फुले शाळेमध्ये या रॅलीची सांगता करण्यात आली. पिंपरी चिंचवड मधील सर्वात मोठी तिरंगा रॅली म्हणता येईल इतकी मोठी आणि भव्य असं या रॅलीचं स्वरूप होत. या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांचा जोश हा पाहण्यासारखं होता. तिरंगा हमारी शान है,तिरंगा हमारी जान है,जिस तिरंगे पे क्रन्तिकारी हुए कुर्बान,वो तिरंगा हमारी जान है.यांसारख्या घोषणांनी भोसरीचं वातावरण दुमदुमल होत.या भव्य अशा तिरंगा रॅली मध्ये ,माजी नगरसेविका शुभांगीताई लोंढे,श्री.किशोर गव्हाणे, पिं.चिं.शहर भाजपा सरचिटणीस विजयराव फुगे,श्री.योगेश लोंढे,श्री.अनिल लोंढे,श्री,विश्वनाथ लोंढे,श्री.भाऊसाहेब पाटील,श्री.सम्राट फुगे,श्री.पिंटू ढगे,श्री.दत्तात्रय गव्हाणे,श्री.निवृत्ती फुगे,श्री.ओंकार डावखर आदी मान्यवर उपस्थित होते.