हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत भव्य रॅलीचे आयोजन
शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हर घर तिरंगा हा उपक्रम मोठ्या उत्साहात राबविला जात आहे. या निमित्ताने पिंपरी चिंचवड शहरातील म्हेत्रे वस्ती, साने चौक चिखली, परिसरात माजी नगरसेवक सुरेश तात्या म्हेत्रे व माजी नगरसेविका स्विनल म्हेत्रे यांच्या वतीने प्रत्येक नागरिकाला तिरंगा झेंड्याचे वाटप करण्यात आले. तसेच हर घर तिरंगा या उपक्रमा अंतर्गत या परिसरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीमध्ये महिलांचा प्रचंड प्रतिसाद पहावयास मिळाला अनेक नागरिकांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला.
आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या हर घर तिरंगा या उपक्रमात जास्तीत जास्त शहरवासीयांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन माजी नगरसेवक सुरेश तात्या म्हेत्रे यांनी केले आहे.